Breaking News

चिंध्रण सरपंच कमला देशेकर यांच्या प्रयत्नातून लोहार समाजाला निधीवाटप

कळंबोली ः प्रतिनिधी

चिंध्रण सरपंच कमला देशेकर यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या 2022-23 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या 15 टक्के निधीतून एनटीबी विश्वकर्मा लोहार समाजाला भांड्यांच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे अपंगांना पाच टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य व ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशकर, उपसरपंच शंकर देशेकर, सदस्य गणपत कडू, सदस्य नरेश सोनवणे, सुरेश मुंबईकर, भालचंद्र कदम, रमेश कदम, गोपीनाथ भागिवंत, यशवंत कदम, वाळकू भागिवंत आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply