नगरसेवक विक्रांत पाटील यांची कार्यतत्परता
पनवेल ः वार्ताहर
पनवेल महापालिका प्रभाग 18मधील पाडा मोहल्ल्यात नाले आणि गटारांची दूरवस्था झाली होती. याबाबत नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे नागरिकांनी तक्रार करताच त्यांनी तातडीने या भागातील नालेसफाई करून घेतली.
पाडा मोहल्ल्यात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत होते. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. नागरिकाचे आरोग्य आणि रोगराई पसरण्याची भीती लक्षात घेत, नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांशी बोलून तातडीने साफसफाई करून घेतली. रमजानच्या पवित्र महिन्यात नालेसफाई करून घेतल्याबद्दल मोहल्ल्यातील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले.