Breaking News

देशात लहान मुलांच्या लसीकरणाला येणार वेग

वेगवेगळ्या वयोगटांसाठी तीन लसींना मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी कोवॅक्सिन, कोर्बेवॅक्स आणि झायकोव्ह-डी या लसींना मंजुरी देत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून दिली.
6 ते 12 वर्षांमधील मुलांसाठी भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन, 5 ते 12 वर्षांच्या मुलांना बायोलॉजिकल ई या कंपनीकडून तयार करण्यात आलेली कोर्बेवॅक्स लस, तर 12 वर्षांवरील मुलांसाठी झायकोव्ह डी लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाला वेग येणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी भारताची कोरोनाविरुद्धची लढाई आता आणखी मजबूत झाल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लसीकरणासंदर्भात बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीत वेगवेगळ्या वयोगटांतील लहान मुलांचे लसीकरण कधी सुरू होणार याविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply