Breaking News

शेअर रिक्षाथांब्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता बुधवारी (दि. 11) सकाळी पनवेल येथील नंदनवन कॉम्प्लेक्सजवळ पनवेल-कामोठे-कळंबोली प्रवास करणार्‍यांसाठी शेअर रिक्षा थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. भाजप पनवेल शहर सरचिटणीस व नगरसेवक नितिन पाटील, नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते थांब्याचे उद्घाटन करण्यात आले.

पनवेल-कामोठे तसेच कळंबोलीकडील वाढत्या रहदारीमुळे प्रवास करणार्‍या प्रवेशांचे हाल पाहता पनवेल येथे त्यांच्यासाठी एका रिक्षा थांब्याची आवश्यकता होती. याकरिता भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेने पुढाकार घेऊन हा थांबा उभारला आहे. या वेळी वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, नगरसेविका दर्शना भोईर, संघटनेच्या सुहासिनी केकाणे, नाका प्रमुख अभिलाष डांगरकर, उप नाकाप्रमुख बाळासाहेब भालेकर, सदस्य पोपट ठोंबरे, सुनील भोपी, राजेंद्र पोटे, भूषण सूर्यवंशी, उमेश बाबर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply