पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकल चर्च पनवेल (प्रोटेस्टंट) यांच्याकडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. लोकल चर्चचे चेअरमन एस.ए. श्रींगारे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे हे पाठिंबापत्र मंगळवारी (दि. 12) सुपूर्द केले.
या पाठिंबापत्रात म्हटले आहे की, नवीन पनवेल व आसपासच्या परिसरात मराठी ख्रिस्ती बांधव वास्तव्यास आहेत. आजपर्यंत लोकल चर्च पनवेलच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. या वेळीही 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा देत असून ते प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी या समर्थन पत्रातून व्यक्त केला आहे.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper