मुरूड : प्रतिनिधी
कायद्याचे भान राखून प्रत्येकाने आपले सण साजरे करावेत. जातीजातीमध्ये सलोखा राखला गेला तरच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील, असे प्रतिपादन मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन गवारे यांनी येथे केले. मुरूड पोलीस ठाण्यातर्फे शहरातील अखिल खतिब यांच्या वाडीमध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पोलीस निरीक्षक गवारे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित राहिले पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. जिल्हा शांतता कमिटी सदस्य आदेश दांडेकर, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांचीही या वेळी समयोचीत भाषणे झाली. डॉ. राज कल्याणी, विश्वास चव्हाण, आशिलकुमार ठाकूर, डॉ. निस्सार बिरवाडकर, मुग्धा जोशी, स्नेहा पाटील, वासंती उमरोटकर, अरविंद गायकर, नितिन आबुर्ले, श्रीकांत गुरव, आदेश दांडेकर, समिर दौनाक, रहिम कबले, इक्रार मोदी, जाहिद फकजी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत म्हात्रे, सहाय्यक फौजदार दीपक राऊळ, पोलीस नाईक सागर रसाळ, सुरेश वाघमारे, परेश म्हात्रे, लहु गोंधळी, धनंजय पाटील, पोलीस शिपाई विक्रांत बांदाणकर, हवालदार इकबाल अत्तार यांच्यासह मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायंकाळची अजान होताच मुस्लिम बांधवांनी फराळाचा आस्वाद घेऊन आपला उपवास सोडला.