पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात गोरगरिबांना हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळे हातात पैसे नाहीत त्यामुळे गोरगरिबांना आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे लिओ क्लब ऑफ नवी मुंबई एपीएमसीच्या माध्यमातून गोरगरिबांना फेस मास्क, सॅनिटायझर, डेटॉल लिक्विड, डेटॉल सोप आदी सामानाचे वाटप करण्यात आले.
या वेळी क्लबचे प्रेसिडेंट नुपूर रुया त्यांचे सहकारी मित्र जसप्रीत काकड, हेमांगी पेस्वानी, शंतनू खोपकर, आमरीन शेख, आशिष द्विवेदी, समीर अहिरे, आयफ्लेक्स टेक्नॉलॉगिजीसचे डायरेक्टर रणजित नरुटे व त्यांचे सहकारी राहुल डोंबळे, दिनेश परब आदी उपस्थित होते.