रोहे : प्रतिनिधी
आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी सोमवार (दि. 2) पासून बेमुदत संपावर जात आहेत. त्यात रोहा नगर परिषद कर्मचारीही सहभागी होणार आहेत.
नगर परिषद कर्मचार्यांच्या प्रलंबीत मागण्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आपल्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे, त्याबाबत सर्व कर्मचारी दिलगिरी व्यक्त करत असल्याची माहिती नगर परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हा चिटणीस रवींद्र आयनोडकर व रोहा अध्यक्ष सचिन दळवी यांनी दिली.