Breaking News

उरण महाविद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम

उरण : रामप्रहर वृत्त

 कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये  कवी कुसूमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा दिन’  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुप्रसिध्द कवी  जितेंद्र लाड व  लक्ष्मण माने उपस्थित होते.प्रथम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “बहु असोत सुंदर” हे गीत सादर केले. मराठी भाषेचा इतिहास व कवितेचे वाचन  संजय पन्ना, सागर वाल्मिकी, आशिष शर्मा या विद्यार्थ्यांनी केले.  तनय दर्णे व  प्रसाद गावंड यानीं पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यावर वाचन केले. तद्नंतर  नमिता मांदाडकर या विद्यार्थ्यांनीने महाराष्ट्र अभियान गीतावर दमदार नृत्य सादर केले. कार्यक्रमाला अधिकाधिक साज चढला तो सुप्रसिध्द कवी जितेंद्र लाड यांच्या कवितांनी आईचे वात्सल्य, बहीणीची माया, बापाचे मुलीवरील प्रेम, महाविद्यालयातील प्रियकर,प्रेयसीचे प्रेम, हुंडाबळी इ. विविध विषयांवर तसेच हृदयस्पर्शी, विनोदी किस्से सांगत आपल्या स्वरचित कवीता सादर केल्या. त्यांच्या समवेत आलेल्या  लक्ष्मण माने यांनी “बाप” हया विषयावर आपली कविता सादर केली.   स्वप्निल पाटील, अंकिता पाटील यांनी  स्वत: तयार केलेल्या मराठी भाषेतील विविध म्हणी व त्यांचे अर्थ हया विषयावरील भित्तीपत्रके बनविली व त्याचे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.  कार्यक्रमाचा समारोप  निशांत कोळी,  प्रतिक्षा जोशी,  सर्वांगी म्हात्रे, आवृत्ती पालकर, मधु गुप्ता, भक्ती तेलंगे,  श्वेता मसुरकर, भूमिका म्हात्रे,  प्राची जोशी, जयदिप उपाध्ये, रोहन पांचाळ,  गौरव सरफरे, पौर्णिमा बुरुड, तेजश्री मोरे  या विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या “माझी मैना गावाकडं राहिली” हे मराठी गीत सादर केले. या सादरीकरणामुळे कार्यक्रम अधिका रंगतदार झाला. प्रा. विनोद इंदुलकर यांनी मनोगत व्यक्त केले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा.डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले व प्रा.डॉ. पराग कारुळकर

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply