पेण : प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन, नागरिकांनी आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी गुरूवारी (दि. 20) येथे केले. महाराष्ट्र नागरी विकास अभियान विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण पेणमधील हॉटेल, शाळा, रूग्णालय, निवासी संकुल, शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणच्या स्वच्छतेबाबत नगर परिषदेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील विजेत्यांना गुरूवारी (दि. 20) नगर परिषद सभागृहात पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील बोलत होत्या. वाढती लोकसंख्या पाहता पेणमध्ये ठिकठिकाणी स्वच्छतेबाबतीत उपाययोजना करण्यात येत असून, त्याला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे नगराध्यक्षा पाटील यांनी या वेळी सांगितले.
मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी प्रास्ताविकात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आस्थापनांची कशा प्रकारे निवड करण्यात आली, याची माहिती दिली. तसेच आरोग्याच्या द़ृष्टीने नागरिकांनी कशाप्रकारे स्वच्छता राखली पाहिजे हे सांगितले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष दिपक गुरव, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक दयानंद गावंड, अभियंता अंकिता इसळ, शहर समन्वयक विशाल सपकाळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात आस्थापनाचे वर्गीकरण करून बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये-
शाळा :
प्रथम : नगर परिषद शाळा क्रमांक 1
द्वितीय : नगर परिषद शाळा क्रमांक 2
तृतीय : नगर परिषद शाळा क्रमांक 6
रूग्णालय :
प्रथम : म्हात्रे हॉस्पिटल पेण
द्वितीय : सिद्धकला हॉस्पिटल पेण
तृतीय : त्रिमुर्ती हॉस्पिटल
हॉटेल :
प्रथम : मंथन हॉटेल
द्वितीय : राधिका हॉटेल
तृतीय : झी गार्डन हॉटेल
रस्ता :
प्रथम : पेण-खोपोली रोड
द्वितीय : चिंचपाडा बायपास
तृतीय : अंतोरा फाटा ते पेण नगर परिषद
सोसायटी :
प्रथम : बालाजी ग्रीन सिटी
द्वितीय : सद्गुरु पार्क
तृतीय : सेन्च्युरीयन सोसायटी
शासकीय कार्यालय :
प्रथम : पेण नगर परिषद
द्वितीय : पंचायत समिती
तृतीय : शासकीय तंत्रनिकेतन
पार्क :
प्रथम : म्हाडा वसाहत उद्यान
द्वितीय : प्रेमनगर उद्यान
तृतीय : पानेरी सोसायटी उद्यान
याशिवाय पेण कृषी उत्पन्न बाजार समिती व रेल्वे स्थानकालाही या वेळी पारितषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रथम पेण रेल्वेस्थानक.