पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा नावडे शहर व मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने उत्सव महाराष्ट्राचा-संस्कृती महाराष्ट्राची हा बहरदार संगीतमय कार्यक्रम तसेच विशेष सन्मान पुरस्कार सोहळा रविवारी (दि. 1) रंगला. या सोहळ्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, तर या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
नावडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या सोहळ्यास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक हरेश केणी, नगरसेविका दर्शना भोईर, भाजप तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, उपाध्यक्ष अमर ठाकूर, खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, जिल्हा सदस्य पवन भोईर, ज्येष्ठ नेते रवींद्र खानावकर, नावडे शहर अध्यक्ष मदन खानावकर, पडघेचे माजी सरपंच कृष्णा पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश खानावकर, जितेंद्र काटकर, युवा नेता महेश पाटील, शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
गुणीजनांचा विशेष सन्मान
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा समालोचक अध्यक्ष संदीप पाटील, रवींद्र भोईर, मुख्याध्यापक बबन काटकर, संदीप मोरे, सचिन पाटील , ठाणे महापालिका उपअभियंता अविनाश आव्हाड, युवा नेता मुकेश वाळूंग, डॉ. सुमन मिश्रा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …