कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत शहरातील कर्जत महिला मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेत शासनाकडून मिळालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाठ्यपुस्तकांचे वितरण करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. या वेळी श्रद्धा मुंढेकर, स्नेहा गाडे, मेघा पिंगळे, प्रेमा पितळे, सर्व शिक्षक, सेविका आणि पालकवर्ग उपस्थित होता.
‘डिश टीव्ही रिचार्जची मुदत वाढवा’
श्रीवर्धन ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाचा श्रीवर्धन तालुक्यातील समुद्राच्या बाजूला असलेल्या हरिहरेश्वर, श्रीवर्धन, आरावी, भरडखोल, दिवेआगर, आदगाव, सर्वे आदी गावांना जबरदस्त तडाखा बसला. अजूनही श्रीवर्धनमधील वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. निसर्ग चक्रीवादळ 3 जूनला झाले. महिन्याच्या सुरुवातीस बहुतांश ग्राहक आपल्या डिश टीव्हीचा रिचार्ज करतात, परंतु वादळानंतर असंख्य विद्युत पोल पडल्यामुळे वीजपुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही. श्रीवर्धनमधील ग्रामीण भागात वीज सुरू होण्यास अजून एक महिन्याचा कालावधी लागेल. परिणामी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या नागरिकांनी डिश टीव्हीचे रिचार्ज केले आहे अशा ग्राहकांना रिचार्जची मुदत वाढवून देणे आवश्यक आहे, अशी येथील अनेक नागरिकांची मागणी आहे.