पनवेल, पालघर : रामप्रहर वृत्त
पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी प्राचार्य डॉक्टर जे. जी. जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोमवारी (दि. 2)झाला. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व रयतचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे आणि यांच्या हस्ते डॉ. जे. जी. जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, डॉक्टर.जे.जी.जाधव हे माणुसकी जपणारे , प्रेमळ आणि सर्वांना आपले जवळचे समजणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या या स्वभावामुले त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. हजारो चांगले विध्यार्थी घडवण्याचे काम त्यांनी केले. प्राचार्य अनेक जण होतात मात्र आपल्या हृदयात स्थान निर्माण करण्याचे काम करणारे हे जे. जी. जाधव हे असे प्रतिपादन केले व पुढील आयुष्य सुखा समाधानाचे जावो, अशा शुभेच्छा दिल्या.
मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जे. जी.जाधव यांचे सेवेचा कार्याकाळ संपुर्ण झाला. त्यानिमित्त त्यांनी आपल्या जीवणभरात रयत शिक्षण संस्थेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या महाविद्यालयात सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजीत करण्यात आला होता.
रयतचे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झालेल्या या सोहळ्याला आमदार सुनील भुसारा, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, प्राचार्य डॉ. पी जी. पवार, डॉ. एन. आर. मढवी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, मोखाड्याचे नगराध्यक्ष अमोल पाटील, शामकांत चुभळे, एल.डी. काटे, संतोष जाधव, प्राचार्य डॉ. एल. डी. भोर, संतोष चौथे, यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.