Breaking News

ट्रेकर 60 फूट दरीत कोसळला; दैव बलवत्तर म्हणून बचावला

पनवेल : वार्ताहर

पनवेल जवळील चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेला एक ट्रेकर 60 फूट खोल दरीत पडल्याची घटना (दि. 4) घडली. मात्र, फक्त दैव बलवत्तर म्हणून हा ट्रेकर बचावला आहे. वृत्त असे, पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, पोलीस हवालदार ओंबासे, बदलापूर रेस्क्यू टीमचे नागेश साखरे व इतर तीन सदस्य यांनी शर्तीचे प्रयत्न करून ट्रेकर विराज संजय मस्के (20 रा. तुळाशेत पाडी, भांडुप याचे प्राण वाचवले आहेत. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तरुण चंदेरी किल्ल्यावरून पनवेलच्या बाजूला खोल दरीत पडल्याची खबर मिळाली. या घटनेची माहिती निसर्ग मित्र संस्थेला देऊन त्यांनाही मदतीसाठी आवाहन करण्यात आले. पो. ह. ओंबासे, रीटघरचे पोलीस पाटील दीपक पाटील, स्थानिक रहिवासी यांनी घटनास्थळी धाव घेत विराज मस्के यास दोरीच्या साहाय्याने दरीतून वर काढले. विराज मस्के व त्याचे सहा मित्र असे सात जण सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास चंदेरी किल्ल्याच्या जवळ पोहोचले. डोंगरावरील किल्ल्याच्या टोकाकडे जात- असताना विराज सर्वांच्या पुढे होता. या वेळी त्याचा पाय घसरून तोल गेला व किल्ल्यावरून तो साठ फूट खाली दरीत कोसळला. दरीत एका दगडाला जाऊन अडकला. या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला, हातापायाला व कमरेला जबर मार लागला. विराजला चालता येत नसल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर झोपवून रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी किल्ल्यावरून पायथ्याशी आणले. रात्र असल्याने जखमी विराजला घेऊन किल्ला उतरण्यास अनेक अडचणी येत होत्या. गुरूवारी सकाळी त्याला किल्ल्यावरुन खाली आणत  रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply