Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून मोहोपाडा, चांभार्लीत विकासकामांचे भूमिपूजन

मोहोपाडा : प्रतिनिधी

आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वासांबे पंचायत समिती गणातील तळेगाव आणि रिस पंचायत समिती गणातील चांभार्ली येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (दि. 14) माजी आमदार देवेंद्र साटम व भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या हस्ते झाला.

सर्वप्रथम तळेगाव येथे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल यांच्या घरासमोर तळेगाव ते पानशिल या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. तलेगाव ते पानशिल या रस्त्याच्या जवळपास 720 मीटर लांबीचा डांबरीकरणासाठी 20 लाखांचा आमदार निधी उपलब्ध झाला आहे. या वेळी कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आल्याचे दिसून आले, तर चांभार्ली येथील मुख्य रस्ता चंद्रकांत जांभले ते नामदेव मुंढे या 150 लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, तर वामन मुंढे ते अनंता पाटील या घरापर्यंत सांडपाणी गटार बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार देवेंद्र साटम व रामदास ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. चांभार्ली येथील रस्त्यासाठी पाच लाखांचा, तर सांडपाणी गटारासाठी दोन लाख 99 हजार रुपये आमदार निधी उपलब्ध झाला आहे.

या वेळी सरपंच ताई पवार, सरपंच बाली कातकरी, उपसरपंच प्रतिप पाटील, विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, माजी उपसभापती गजानन मांडे, माजी उपसरपंच अमित मांडे, पंचायत समिती विभागप्रमुख आकाश जुईकर, पोलीस पाटील अनंता पाटील, ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील, नारायण तांडेल, चेतन जाधव, सुदाम कडपे, भरत मांडे, दिलीप पाटील, विशाल मुंढे, तुकाराम मुंढे, प्रवीण जांभळे, नंदूकुमार कुरंगले, ग्रामविकास अधिकारी कांबळे साहेब, प्रवीण कालबागे, दत्तात्रेय जांभळे, वासुदेव जांभळे, तुकाराम मुंढे, सीताराम मुंढे, कमळू मुंढे, हरिभाऊ जांभळे, नारायण जांभळे, प्रमोद जांभळे, धनाजी जांभळे, किरण मुंढे, नागेश कुंभार, अजित जांभळे, ज्ञानेश्वर जांभले आदी उपस्थित होते.

मे महिनाअखेर वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील खोळंबलेली इतर विकासकामेही सुरू होणार असल्याचे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल यांनी बोलताना सांगितले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply