Breaking News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त जागर

पनवेल : रामप्रहर वृत्त

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ’मिशन माणुसकी’ या संस्थेतर्फे तीन दिवसांचा विचार-साहित्य-कला जागर करून केली जाणार आहे.

या ऑनलाइन जागर महोत्सवात अभिनेत्री रत्ना पाठक-शहा, ज्येष्ठ विचारवंत पत्रकार पी. साईनाथ, अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. बाबुराव गुरव, लोकशाहीर गदर, सामाजिक भाष्य कविताकार रामदास फुटाणे आदी नामवंत सहभागी होणार आहेत. 30, 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत ’मिशन माणुसकी’च्या फेसबुक पेजवरून या महोत्सवाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येईल. 30 जुलैला संध्याकाळी 6 वाजता रत्ना पाठक-शहा वर्तमान सांस्कृतिक स्थितीवर भाष्य करून ’अण्णाभाऊ जागर’चे उदघाटन करतील. तर स्थलांतरित मजुरांचे देशवास्तव पी. साईनाथ मांडणार आहेत.

31 जुलैला रामदास फुटाणे उद्घाटन करणार असून अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, नीरजा, प्रज्ञा दया पवार, विजय चोरमारे, भगवान निळे आदी कवी राजकीय सामाजिक आशयाच्या कविता सादर करतील. डॉ. महेश केळुसकर या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत. 1 ऑगस्ट हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन. या दिवशी लोकशाहीर गदर यांनी ’शाहिरी जलसा’चे उद्घाटन केल्यावर या शाहिरी जलसा कार्यक्रमात लोकशाहीर संभाजी भगत (विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा), लोकशाहीर निकम, लोकशाहीर संजय जाधव आणि एल्गार सांस्कृतिक मंच अण्णाभाऊंना शाहिरी मानवंदना देतील.

Check Also

देशाचे प्रधानसेवक म्हणून नरेंद्र मोदी कार्यरत -मंत्री ॲड. आशिष शेलार

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे प्रधानसेवक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. म्हणूनच जनतेचा त्यांच्यावर …

Leave a Reply