मुरुड : प्रतिनिधी
किडन्या पुर्णपणे बंद झाल्या तरी रुग्ण डायलिसिसद्वारे आपली जीवनचर्या चालू ठेवू शकतो. मुरुड परिसरातील किडनी रुग्णांना जीवदान देण्याचा आमचा संकल्प असून संजीवनी आरोग्य सेवा संस्थेमार्फत डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली जाईल, अशी ग्वाही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने रविवारी (दि. 5) येेथे दिली.
संजीवनी आरोग्य सेवा संस्थे तर्फे मुरुडमध्ये श्रीमती अंजनाबाई पुंडलिकराव लहाने डायलेसीस सेन्टर सुरु करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण रविवारी डॉ. लहाने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात तेे बोलत होते. या डायलिसीस सेंटरमुळे येथील जनतेला एक चांगली आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे, असे डॉ. लहाने म्हणाले.
मुरुडमध्ये डायलेसिस सेन्टर होणे गरजेचे होते. ते स्वप्न आज पुर्ण होत आहे. त्यामुळे हा दिवस मुरूडकरिता सोनेरी दिवस असल्याचे डॉ. मकबुल कोकाटे यांनी सांगितले. नेत्रतज्ज्ञ डॉ. रागिणी पारेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
दिपाली दिवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. विक्रम पाडोळे, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, नगरसेवक विश्वास चव्हाण, अशोक धुमाळ, मंगेश दांडेकर, नगरसेविका आरती गुरव, युगा ठाकूर, मेघाली पाटील, दिपाली दिवेकर, भाजपचेे ज्येेष्ठ नेते अॅड. महेेश मोहिते, संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय सुर्वे, नसीम महाडकर, संदिप पाटील, नितीन आबुर्ले, अतिक खतीब, जहुर कादिरी, दिलीप जैन, डॉ. बिरावटकर, चंद्रकांत अपराध आदिंसह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. चंद्रकांत अपराधी यांनी आभार मानले.
मुरुड तालुक्यात आतापर्यंत किडनीचे 32 रूग्ण आढळून आले आहेत. या रूग्णांना रोजच्या रोज अलिबाग व इतर ठिकाणी जाऊन डायलेसीस करावे लागत आहे. आजपासून ही सेवा मुरूडमधील श्रीमती अंजनाबाई पुंडलिकराव लहाने डायलेसीस सेन्टरमध्ये उपलब्ध झाली आहे.
-डॉ. तात्याराव लहाने, संस्थापक अध्यक्ष,
संजीवनी आरोग्य सेवा संस्था