Breaking News

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई

कर्जत : बातमीदार

पाणीटंचाई निर्माण झालेल्या कर्जत तालुक्यातील तीन वाड्या आणि दोन गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची केलेली मागणी केली आहे मात्र पंचायत समिती प्रशासन ही मागणी पूर्ण करीत नसल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील 58 आदिवासी वाड्या आणि 23 गावांमध्ये यंदा पाणीटंचाई आहे. मार्च अखेरपासून कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तेथील महिलांना काही किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत आहे.

तालुक्यातील ताडवाडी, मोरेवाडी, जांभुळवाडी या तीन आदिवासी वाड्या आणि मोग्रज तसेच पिंगळस या दोन गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथील ग्रामस्थांनी टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी कर्जत पंचायत समितीकडे मागणी केली आहे. मात्र शासनाने अद्याप टंचाईग्रस्त भागासाठी टँकरचे अधिग्रहण केले नाही. त्यामुळे मागणी येऊनदेखील शासकीय यंत्रणा पाणीटंचाई दूर करण्याचे काम करताना दिसत नसल्याने  ग्रामस्थ संतप्त आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply