Friday , March 24 2023
Breaking News

शेकापला पश्चातापाची वेळ येेईल

आ. नीलम गोर्‍हे यांचा सूचक इशारा

पाली : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सिंचन घोटाळे, धान्य घोटाळ्यातून जनतेची विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे, अशी टीका शिवसेना नेत्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी केली. राष्ट्रवादीला साथ देणार्‍या शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. त्या पाली येथील महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होत्या.

शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पाली येथील मंदिरात गुरुवारी (दि. 11) सायंकाळी जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी आमदार गोर्‍हे यांनी सदाचारी व निष्कलंक राहून कारकीर्द गाजविणार्‍या अनंत गीतेंना रायगड मतदारसंघातील सुज्ञ जनता सातव्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास व्यक्त केला. सभेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

राष्ट्रवादीचा समाचार घेताना आमदार गोर्‍हे म्हणाल्या की, रायगडपासून बारामतीपर्यंत अक्षरशः घराणेशाही फोफावली आहे. सामान्य जनतेने यांची जुलूमशाही मोडून काढली पाहिजे. सुनील तटकरेंनी गावागावात भांडणे लावली. सातत्याने जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे तटकरे गल्लीत, तर अनंत गीते दिल्लीत आहेत.

चित्रपटातील अभिनेत्रीपेक्षा दिवसरात्र काबाडकष्ट करणार्‍या रायगडच्या माता-भगिनी अधिक रूपवान व समाधानी दिसतात, अशा शब्दांत आमदार गोर्‍हेंनी येथील महिलावर्गाचा गौरव केला.

आमदार प्रवीण दरेकर यांनी शेकाप व राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. दोन भ्रष्टाचारी एकत्र येऊन जनतेला वेठीस धरत आहेत. भ्रष्ट लोकांना सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन म्हणाले की, गीते साहेबांनी सुधागडवर भरभरून प्रेम केले. येथील जनतेनेही नेहमीच गीते साहेबांना मोलाची साथ दिली. या निवडणुकीतही सुधागड तालुका मताधिक्यात अग्रेसर राहील, असा विश्वास वाटतो.

भाजप जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील यांनी, रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही भ्रष्टाचार व सदाचार अशी लढत आहे. इतरांनी कुणी मोठे होऊ नये. केवळ कुटुंबातील सदस्यांचे भले व्हावे, अशी भूमिका सुनील तटकरेंनी नेहमी ठेवली. त्यांचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार करावा.

माजी मंत्री आणि भाजप नेते रवीशेठ पाटील यांनी, फसव्या सुनील तटकरेंना मते देऊ नका, असे आवाहन केले. महायुतीचे उमेदवार अनंत गीते शंभर टक्के निवडून येणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

भाजप सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, जिल्हा चिटणीस राजेश मपारा, मराठा समाज तालुका अध्यक्ष गणपतराव सितापराव आदींनी अनंत गीतेंना पेण-सुधागड- रोहा विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली.

या सभेस भाजप जिल्हा सरचिटणीस सुनील दांडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, पंचायत समिती उपसभापती उज्ज्वला देसाई, जि. प. सदस्य रवींद्र देशमुख, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सु. दा. भोय, चंद्रकांत घोसाळकर, राजेंद्र गांधी, अरुण खंडागळे, अजय खंडागळे, अश्विनी रुईकर, भाजप तालुका सरचिटणीस आलाप मेहता, निखिल शहा, शरद फोंडे, शिरिष सकपाळ, विद्देश आचार्य, रवींद्र जंगम, वर्षा सुरावकर, सोनल मढवी, आरती भातखंडे, निहारिका शिर्के आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply