Breaking News

महाड वरंध घाटात टँकर अडकल्याने वाहतूक विस्कळीत

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील वरंध घाटात एका अवघड वळणावर अवजड ट्रक अडकल्याने महाड-भोर-पुणे मार्गावरील वाहतूक शनिवारी (दि. 7) दुपारी विस्कळीत झाली.  घाट वाहतुकीस धोकादायक असतानादेखील अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अवजड वाहने अडकून या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे.

महाड-भोर-पुणे मार्गावरील वरंध घाटात सलग दोन वर्षे ऐन पावसाळ्यात दरडी कोसळत आहेत. गेली दोन वर्षे हा मार्ग सातत्याने बंद ठेवला जात आहे. यामुळे हा मार्ग अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरू लागला आहे.

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडूनदेखील बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर घाट रस्ता वाहतुकीस पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र अरुंद घाट रस्त्यामुळे हा मार्ग अवजड वाहनांना धोकादायक असतानाही या मार्गावरून बारा ते सोळा चाकी वाहने सोडली जातात. ही अवजड वाहने घाटात  अडकून या मार्गावरील वाहतूक ठप्प होते.

शनिवारी दुपारी वरंध घाटात एक टँकर अडकून पडला आणि काही तासाकरिता महाड-भोर-पुणे मार्ग बंद राहिला. यामुळे छोट्या वाहनांनादेखील अडकून राहावे लागले. यापूर्वी जानेवारी महिन्यात याच ठिकाणी अडकून पडला होता. मात्र सातत्याने या घटना घडूनदेखील याबाबत प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

Check Also

‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!

अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं …

Leave a Reply