पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जु. कॉलेज व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
शिक्षणाचा वारसा जपणारे व महान समाजसेवक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत साहेबांची 34वी पुण्यतिथी गव्हाण विभागातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व मोरू नारायाण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 7) झाली. खर्या अर्थाने ज्ञानाचा दिवा लावत अंधाराकडून उजेडाकडे नेण्याचे कार्य स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत साहेबांनी केले. या महान व्यक्तीस मानवंदना अर्पित करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, मेंबर बोर्ड ऑफ डायरेक्टर वसंतशेठ पाटील, जयवंत देशमुख, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, रघुनाथ देशमुख, कमलाकर देशमुख, योगिता भगत, कामिनी कोळी, किशोर पाटील, रुपेश म्हात्रे, महेश म्हात्रे तसेच मोरू नारायाण म्हात्रे विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. डोईफोडे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रणिता गोळे तसेच दोन्ही विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.