पुण्यतिथीनिमित्त शेलघर येथे अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी माणसे जोडण्याचे काम त्यांनी केले आणि तोच वारसा आपण सर्वांनी पुढे चालवावा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 7) शेलघर येथे केले.
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते आणि थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांची 34 वी पुण्यतिथी शनिवारी होती. त्यानिमित्त भगत साहेबांच्या शेलघर येथील घरी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनार्दन भगत साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर, वहाळ जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, पनवेल महपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, न्हावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, भाजप नेते हेमंत ठाकूर, संजय भगत, भाऊशेठ पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जयवंत देशमुख, रवींद्र भगत, विश्वनाथ कोळी, अजय भगत, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.