Breaking News

महाडमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त

चार जणांना अटक

महाड : प्रतिनिधी 

महाड तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती महाड पोलिसांना मिळाली होती. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर आणि बिरवाडी परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात सुमारे आठ लाख रुपयाचा गुटका जप्त करण्यात आला. त्याच बरोबर चार गुटका माफियांवर कारवाई करण्यात येऊन येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. महाड पोलिसांनी मी तंबाखूजन्य प्रतिबंधित पदार्थाची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली.

महाड तालुक्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते त्याच प्रमाणे खुलेआम काही दुकानातून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे शहरात तसेच बिरवाडीमध्ये पोलिसांनी शनिवारी दुपारनंतर धडक कारवाई करून सुमारे आठ लाख रुपयाचा गुटका जप्त केला, सर्वात आश्चर्य असे की बहुतांशी साठा हा कापड दुकान आणि किराणा मालाच्या दुकानात आढळून आला. या कारवाईमध्ये चार गुटका माफियांना पोलिसांनी अटक केली आहे.

शनिवारी दुपारी पोलिसांनी बिरवाडी तील निलेश जीवन मोरे (वय 46, रा. बिरवाडी, ता. महाड) याच्या दुकानातून एक लाख 47 हजार 40 रुपये किमतीचा गुटका जप्त केला त्यानंतर महाड शहरातील जुना पोस्ट, सरेकर आळी या विभागात कारवाई करण्यात आली. शहरात मध्यवर्ती वस्तीमध्ये खुलेआम गुटख्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे उघड झाले. जुना पोस्ट या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रमेश नाथूराम माळी (वय 40) यांच्या कापड दुकानातून गुटका विक्री केली जात होती. त्यानंतर जवळच असलेल्या राजेश जयंत थरवळ यांच्या दुकानावर छापा मारून गुटख्याचा साठा जप्त केला, तसेच शहरातील सरेकर आळी परिसरातील समीर वसंत पारेख (वय 47) यांच्या दुकानाच्या मागील भागात असलेल्या बंद खोलीतुन गुटख्याची पाकिटे जप्त करण्या यात आली.

महाड शहरातून पोलिसांनी सहा लाख 57 हजार रुपये किमतीचा गुटका जप्त केला. पोलिसांनी रमेश माळी राजेश थरवळ आणि समीर पारेख या तिघांना महाडमधून अटक केली, तर निलेश मोरे याला बिरवाडीतुन अटक केली आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोपडे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आंधळे पुढील तपास करीत आहेत.

Check Also

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …

Leave a Reply