Breaking News

पनवेलमध्ये साकारतेय ऑक्सि पार्क; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका आणि कोशिश फाऊंडेशनच्या माध्यमातून शहीद भोसले पेट्रोल पंपासमोरील जागेत ऑक्सि पार्क उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन महापालिका सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले.पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंपासमोरील जागेची दुर्दशा झाली होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी गार्डन उभारण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिका आणि कोशिश फाऊंडेशनच्या माध्यमातून या जागेत ऑक्सि पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कच्या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. भूमिपूजन समारंभास नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, संजय जैन, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, चेतन जाधव आदी उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply