पुणे : प्रतिनिधी
दहावी आणि बारावीच्या परीक्षांची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असून बारावीचा निकाल 10 जून, तर दहावीचा 20 जूनपर्यंत लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले जातात. यंदा दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता तसेच कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या असंख्य प्रतिनिधींनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासता ते परत केले होते. यामुळे या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती, परंतु राज्य शिक्षण मंडळाने नियोजन केल्याने या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुरूळीत सुरू होते. त्यामुळे निकालास तेवढा उशीर होणार नाहीये.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …