अलिबाग : प्रतिनिधी
केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी रविवारी (दि. 8) राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)च्या थळ प्रकल्पाला भेट दिली.
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आरसीएफच्या उच्च व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत थळ कारखान्यातील ऊर्जा कार्यक्षमता वाढीसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि ऊर्जा व पर्यावरण संवर्धनासंबंधीच्या प्रस्तावांवर चर्चा केली. त्यानंतर विविध संयंत्रांना भेट देऊन संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले.
तत्पूर्वी आरसीएफ थळच्या प्रशासकीय इमारतीसमोर वृक्षारोपण तसेच कार्यकारी संचालक यांच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन मंत्री महोदयांच्या हस्ते झाले तसेच भेटीदरम्यान सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन आरसीएफने 2021-2022मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मंत्री महोदयांनी कौतुक केले. कोरोना महामारीच्या कठीण काळात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल कर्मचार्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत संकल्पना सुनिश्चित करण्यासाठी आरसीएफच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper