
खारघर ः येथील जय माताजी सेवा संघाच्या वतीने शनिवारी ‘माँ का विशाल दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, खारघर नगरसेविका हर्षदा उपाध्याय, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, मांजरेकर मामा, अजय माळी, राजेंद्र अग्रवाल, मुकेश अग्रवाल, संदीप कासर, मोहित अग्रवाल, मनीष अग्रवाल, मधुमिता झेना, रमेश मेधूर आदी उपस्थित होते.