Sunday , October 1 2023
Breaking News

विकासकामांच्या जोरावरच बारणे विजयी होणार

अरूणशेठ भगत यांचा दावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शेलघर, बेलपाडा आणि गव्हाण येथं शुक्रवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

या वेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, गव्हाण ग्रामपंचयातीच्या सरपंच हेमलता भगत, उलवे नोड 2चे अध्यक्ष विजय घरत, उलवे नोड 1चे अध्यक्ष मदन पाटील, व्ही. के. ठाकूर, जी. एल. ठाकूर, हरेश्वर म्हात्रे, जिल्हा वाहतूक सेलचे उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, गिरजाभाई कातकरी, योगिता भगत, पनवेल उपाध्यक्ष हनुमंत भोईर, उलवा संघटक उत्तम म्हात्रे, उलवा शहर अध्यक्ष मनोज घरत, कोपर शाखा अध्यक्ष अनिल घरत, गव्हाण शाखा अध्यक्ष प्रदिप ठाकूर, पनवेल महाराष्ट्र वाहतूक अध्यक्ष विकास कोळी, जागृती ठाकूर, विभाग प्रमुख क्रिष्णा भोईर, प्रणिता भोईर, उपविभाग प्रमुख अतिश पाटील, विनोद पाटील, अविनाश कोळी, गणेश कोळी, धनंजय कोळी, मयुर कोळी, किशोर कोळी, सुयोग कोळी, प्रविणा भोईर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

वुशु स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे वर्चस्व; 11 सुवर्णांसह एकूण 32 पदकांची कमाई

खारघर : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी …

Leave a Reply