Breaking News

चिरनेर गावापर्यंत एनएमएमटी सेवा सुरू करण्याची मागणी

उरण : बातमीदार

नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी उरणमधील प्रवाशी नवी मुंबई परिवहन सेवा (एनएमएमटी)च्या बसेसने खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मुंबई, नवी मुंबईमधून अनेक प्रवाशी एनएमएमटीच्या बसने उरणमध्ये येतात. जुईनगर येथून असलेल्या बसेस कोप्रोलीपर्यंत येत असतात, मात्र कोप्रोली गावाच्या पुढे असलेल्या गावांना एनएमएमटीच्या बससेवेचा फायदा मिळत नाही.त्या अनुषंगाने जुईनगर ते चिरनेर अशी बससेवा सुरू करण्याची मागणी कळंबुसरे ग्रामपंचायतीमार्फत एनएमएमटी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

भविष्यात इलेक्ट्रिक बसचे प्रमाण वाढणार असून त्याचा फायदा प्रदूषण मुक्तीसाठी तर होणारच आहे. त्याचबरोबर नागरिकांचे प्रवास सुखकर होऊन त्यांच्या पैशांची बचतदेखील होईल. अशीच बस सेवा जुईनगर ते चिरनेर येथे सुरू करण्यासाठी बुधवारी (दि. 11) भाजपचे युवा कार्यकर्ते अरुण पाटील, वसंत भोईर, संतोष गायकवाड यांनी एनएमएमटीचे प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन जुईनगर ते चिरनेर गावापर्यंत बस सेवा चालू करण्यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.

लवकरच बस सेवा चिरनेर गावापर्यंत चालू करण्याचे आश्वासन अधिकार्‍यांकडून देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक वातानुकूलित एनएमएमटी चा फायदा गावातील वयोवृद्ध, दिव्यांग, नोकरदार वर्ग, विद्यार्थी सर्वांना होणार आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply