Breaking News

‘आरटीआयएससी’चा बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जी याने लातूर येथे झालेल्या स्पर्धेत चकमदार कामगिरी केली. यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जीने 50+ गटातील दुहेरीत विजेतेपद, मिश्र दुहेरीत उपविजेतेपद पटकावले, तर एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. याबद्दल त्याला पदक देऊन गौरविण्यात आले. प्रशांत आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply