Breaking News

गुटखा घेऊन येणार्‍या ट्रकवर कारवाई

पोलिसांनी जप्त केला एक कोटींचा मुद्देमाल

पनवेल ः वार्ताहर

गुजरातहून नवी मुंबईत अवैधरित्या गुटखा आणून विकणार्‍या टोळीवर तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करीत एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नवी मुंबई येथील महापे चेकपोस्ट येथे तुर्भे पोलीसांना नाकाबंदी दरम्यान चेकिंग करीत असताना एका टेम्पोमध्ये गुटख्याच्या 30 मोठ्या गोणी व टेम्पो जप्त केला होता. या अनुषंगाने तपास करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जोशी, सपोनि. प्रभाकर शिऊरकर, हवालदार जितेंद्र पवार, पालीस नाईक सोमनाथ भालेराव, संतोष पालवे, आनंद सोनकांबळे, शिपाई राजेश आघाव, मनोहर जाधव, राजेश उगाडे, सुनील सकट आदींच्या पथकाला गुटखा हा डोंबिवली परिसरात राहणारे आरोपी गुजरात येथून मागवून त्याची ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रायगड परिसरात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने डोंबिवली परिसरातील पलावा सिटी व पिंपळेश्वर मंदिराजवळून आयशर कंटेनर व टेम्पो गुटख्यासह ताब्यात घेतला.

याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही चालक व डोंबिवली मानपाडा येथून गुटखा विक्री करणारा असे तीन जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 99 लाख 78 हजार 264 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply