Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात कोरोना लसीकरणाचा विक्रम

एकाच दिवसात दोन कोटींहून अधिक नागरिकांना डोस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त होत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी शुक्रवारी (दि. 17) एकाच दिवसात देशात दोन कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे.
याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून म्हटले की, वॅक्सिन सेवा करताना आज देशातील आरोग्य कर्मचार्‍यांनी देशवासीयांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना ही भेट दिली आहे. मोदींच्या वाढदिनी आज भारताने नवा विक्रम प्रस्थापित करीत एका दिवसात दोन कोटी लसींचा ऐतिहासिक असा आकडा पार केला आहे
भारताने कोरोना लसीकरण या अगोदर 27 ऑगस्टला 1.03 कोटी नागरिकांना डोस देण्यात आले. 31 ऑगस्टला 1.33 कोटी नागरिकांना, तर 6 सप्टेंबरला 1.13 कोटी नागरिकांना लस देण्यात आली. शुक्रवारी दोन कोटी नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य होते. ते पार झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत लसीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत 77 कोटी लसीकरण झाले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply