पनवेल : प्रतिनिधी
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे 12 हजार 500हुन अधिक गरीब, गरजूंना कुटुंबांना सामाजिक भावनेतून जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य केले. पनवेलमध्ये असलेल्या सर्व झोपडपट्टी वसाहत, दुर्गम भाग, आदिवासी बांधव, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारे अशा सर्वसामान्य नागरिकांना याद्वारे दिलासा देण्यात आला आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटुंबीय उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गरीब गरजूंना तांदूळ, डाळ, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची मदत सुरू केली. पनवेल भाजपच्या माध्यमातून ही मदत पोहोचविण्यात आली. या पवित्र कार्यात आपणही योगदान दिले पाहिजे या सामाजिक भावनेनेतून भाजपचे लोकप्रतिनिधी तसेच काही उद्योजकांनीही आर्थिक योगदान दिले आहे.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …