Breaking News

उलवे सेना सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य भाजपमध्ये

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून उलवे सेना सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी रविवारी (दि. 15) विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केेले.  उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य उषा देशमुख, सुनीता घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कोपर गाव अध्यक्ष सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, वसंत पाटील, भार्गवशेठ ठाकूर, अजय भगत, व्ही. के. ठाकूर, अनंताशेठ ठाकूर, भाऊ भोईर, जोत्स्ना ठाकूर, अनुप भगत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उलवे सेना सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन आवटे, सचिव गुड्डू कनोजिया, सल्लागार किरण लोहकरे, मनोज सिंह, खजिनदार विकी भिडे, सहखजिनदार प्रज्वल चड्ढा, महिला अध्यक्ष सुवर्णा सनस, उपाध्यक्ष मनीषा आवटे, सदस्य अमित झा, नित्यानंद पांडे, बिपीन भोसले, अरुण भालेराव, किशोर भोसले, सोपान सूर्यवंशी, प्रसाद मुंबईकर, सोनू शर्मा, विलास सनस, सीमा कनोजिया, लिपी झा, स्वतंत्र राय, दुर्गेश पांडे, अभिषेक शिंदे, राजकुमार कौनाली, पल्लवी सुर्वे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply