Breaking News

पतसंस्थेचा कारभार पारदर्शक -चौलकर

नागोठणे : प्रतिनिधी

आमच्या पतसंस्थेला 21 वर्षे पूर्ण होत आहेत. नागोठण्यातील सर्वात जुनी पतसंस्था म्हणून आमच्या संस्थेची नोंद झाली असून, कोणतेही राजकीय लागेबांधे नसलेल्या या पतसंस्थेचा कारभार पारदर्शक आहे, याचा आम्हा सर्वांनाच अभिमान वाटत आहे, असे येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी सांगितले.

नागोठणे येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 28) येथील हॉटेल इंद्रप्रस्थच्या सभागृहात पार पडली, त्या वेळी विलास चौलकर बोलत होते. संस्थेच्या नफ्यात दुप्पट अशी वाढ झाली असून हे सर्वांच्या प्रयत्नांतूनच शक्य झाले असल्याचे चौलकर यांनी या वेळी सांगितले.

कर्जवाटप मोठ्या प्रमाणात होत असले, तरी कर्जवसुली सुद्धा उल्लेखनीय अशीच होत असल्याने भविष्यात ही पतसंस्था जिल्ह्याच्या पातळीवर जाईल, असा विश्वास कुणबी समाजाचे नेते शिवराम शिंदे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. अष्टविनायक पतसंस्था नागोठण्याची लाईफ लाईन असल्याचे गौरवोद्गार स्टेट बँकेचे बी. एस. पाटील यांनी आपल्या भाषणात काढले.

या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सुजाता जवके, प्रमोद नागोठणेकर, संदीप गुरव, महेंद्र म्हात्रे, प्रसाद जोगत, के. जे. जांभळे, नेहा धाटावकर, बाळाराम पोटे, चेतन कामथे, रिया वाजे, प्रदीप जगताप, सुजाता नांदगावकर, राजेश वैशंपायन तसेच दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले  गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आदींना मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सूत्रसंचालन रोहिदास हातनोलकर यांनी केले. या कार्यक्रमाला  संस्थेचे संस्थापक जयराम पवार, उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी, भाईसाहेब टके, कोकण मर्कंटाईल बँकेचे अशोक हिरवे, बँक ऑफ बडोदाचे दिपककुमार, आरती हातनोलकर यांच्यासह संचालक मंडळ पदाधिकारी व सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या व्यवस्थापिका शैला घासे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply