Breaking News

श्रीसदस्यांकडून पनवेलमधील 27 गावांमध्ये स्वच्छता अभियान

पनवेल : वार्ताहर

ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने तसेच पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे समिती यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील 27 गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.

रविवारी (दि. 15) सकाळी 7 वाजल्यापासून ग्रामस्वच्छता अभियानात श्रीसदस्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण करून कचर्‍याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.

नितळस, श्री मंगलवाडी, ब्राम्हण करवले, म्हात्रेपाडा, शेलारपाडा, पोसरी, कुंभार्ली, चिरड, पाली, बुर्दुल, विठ्ठलवाडी, नार्हेन, ऊसाटणे, आंबे-चिंचवली, कुत्तरपाडा, शिरवली, कानपोली, चींध्रण, मोहोदर, चिंचवली, आंबे म्हाळुंगी, नेवाळी, कोळवाडी, वावंजे, खैरणे, वलप, पाले बुद्रुक या गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग रेवदंडा यांच्यातर्फे गेली अनेक वर्ष सातत्याने समाजसेवेचे कार्य सुरू आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply