Breaking News

शिवसेनेचे हिंदुत्व खोटे

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जबरदस्त घणाघात

मुंबई ः प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरेंनी सभेतील भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या या टिकेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. असली आणि नकली दोन्हीचे उत्तर मिळणार, मग ते हिंदूत्व असो की, उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा विषय असो. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत होती का उत्तर द्यायची? अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.

बाळासाहेब ठाकरे हे असली आहेत, तर उद्धव ठाकरे नकली आहेत, असे म्हणत किरीट सोमय्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका केली. तुमचे हिंदूत्व खोटे आहे. उद्धव ठाकरे हे डरपोक आहेत. त्यांनी एकाही घोटाळ्यावर स्पष्टता दिली नाही. असली कोण आणि नकली कोण हे जनतेला माहिती आहे. तुमच्या माफिया सेनेच्या 18 जणांची चौकशी सुरू आहे. तुमचे अनेक मंत्री कोर्टात चकरा मारत आहेत. काही जेलमध्ये आहेत, तर काही रुग्णालयात आहेत, असेही सोमय्या या वेळी म्हणाले.

किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. तुमच्यात हिंमत असेल तर स्पष्ट करा की, ते 19 बंगले कोणाचे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

2019च्या पत्रामध्ये रश्मी उद्धव ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी अलिबागमध्ये माझे 19 बंगले आहेत. 2014 मी अन्वय नाईककडून विकत घेतले होते. तेव्हापासून हे बंगले आहेत. हे सर्व बंगले माझ्या नावावर करा, असे लिहिल्याचे सोमय्यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी दुसरे पत्र दाखवत कोणत्या पत्रातील रश्मी उद्धव ठाकरे खर्‍या आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी रश्मी ठाकरे यांचे 2021चे पत्र दाखवले आणि या पत्रात रश्मी उद्धव ठाकरे यांनी माझ्या नावावर 19 बंगले नव्हतेच. एप्रिल 2014मध्ये ज्यावेळी जागा घेतली, त्यावेळीसुद्धा हे बंगलेे नव्हते, असे लिहिल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी लबाडी

महाराष्ट्रच्या जनतेला लुटण्याचे काम उद्धव ठाकरे सरकार करीत आहेत. लबाडी कोण करतेय, हे जनतेला माहित आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे लबाडी कराताहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply