बाजूला सारून रस्ता केला मोकळा
पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेमुळे मोठे वृक्ष रस्त्यावर पडून होणारी दुर्घटना टळली आहे. त्यांनी वेळीच अग्निशामक दलाला घटनास्थळी प्राचारण करून तो वृक्ष बाजूला काढला आहे.
पनवेल शहरातील प्रभाग क्र.19मधील एमईसीबी कार्यालयासमोर असलेले मोठे झाड रविवारी (दि. 15) रात्री 8 वाजता अचानक मुख्य रस्त्यावर पडले. त्यामुळे काही काळ रस्ता बंद झाला होता. याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना येथील काही नागरिकांनी व व्यापार्यांनी दिली. त्यांनी तत्काळ तेथे जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मदतीने बॅरीगेट लावून तेथील वाहतूक थांबवली व याबाबतची माहिती नगरसेवक राजू सोनी यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, तसेच महानगरपालिकेतील संबधित अधिकार्यांना कळविली.
या वेळी राजू सोनी यांच्या मदतीला कोळीवाड्यातील काही मुलेसुद्धा धावली. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी राजू सोनी तेथे उभेच राहून होते तसेच पनवेल महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना व त्यांच्या पथकाला त्याठिकाणी बोलवले व पडलेले झाड बाजूला करण्यासाठी त्यांनी त्यांच्या यंत्रणाच्या सहाय्याने या झाडांच्या फांद्या कापून रस्त्याच्या बाजूला करून दिल्या. त्यानंतर महापालिकेच्या सफाई कर्मचार्यांना बोलवून या फांद्या बाजूला करून संपूर्ण रस्त्यावर झाडून रस्ता स्वच्छ केला व वाहतुकीस मार्ग मोकळा केला. त्यामुळे येथील नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी यांचे कौतुक व आभार मानले आहेत.