श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन शहरातील गणेश आळी येथे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 15) करण्यात आले होते. या स्पर्धेत एसजीसीसी लायन संघाने विजेतेपद पटकाविले, तर एसजीसीसी किंग संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेतील मालिकावीर विशाल सातम, उत्कृष्ट फलंदाज यशवंत वाठोरे, उत्कृष्ट गोलंदाज नंदन सातम, ऑरेंज कॅपचा मानकरी मिहीर सातम, पर्पल कॅपचा मानकरी यश सातम यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय 40+चे विजेता राजू सुर्वे यांचा संघ आणि महिलांमध्ये एसजीसीसी क्वीन संघाने बाजी मारली.
सर्व विजेत्या संघांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत लहान मुलांपासून महिला, ज्येष्ठ अशा सर्वांना खेळण्याची संधी प्राप्त झाली. प्रत्येक सामन्यातील सामनावीराला गौरविण्यात आले.
Check Also
पनवेलच्या श्लोकची आंतरराष्ट्रीय भरारी!
‘३:३०’ लघुपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवड; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा पनवेल : …
RamPrahar – The Panvel Daily Paper