नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सदस्यांना मंगळवारी (दि. 9) सभागृहात निरोप देण्यात आला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. जुलै 2007मध्ये गुजरातचे पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये गेले असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांतून अश्रू तरळले.
‘पद, कार्यभार, सत्ता येते आणि जाते, मात्र हे सर्व कसे संभाळावे हे गुलाम नबी आझाद यांच्याकडून शिकले पाहिजे,’ असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले. यानंतर त्यांनी आझाद यांच्याकडे बोट दाखवून त्यांना सलाम ठोकला. मोदींनी सलाम केल्यानंतर आझाद यांनाही अगदी नम्रपणे नमस्कार करीत तो स्वीकारला. या वेळी सर्वच खासदारांनी बाके वाजवून पंतप्रधानांच्या या कृतीचे कौतुक केले. ‘मी तुम्हाला कधी निवृत्त होऊ देणार नाही. मी यापुढेही तुमचे सल्ले घेत राहिल. माझे दरवाजे तुमच्यासाठी कायमच उघडे असतील,’ असा शब्दही पंतप्रधान मोदींनी आझाद यांना दिला.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …