तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभांरभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगिण विकास होत आहे. त्या अंतर्गत तालुक्यातील बेलवली आणि वारदोली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्ता काँक्रिटीकरण आणि शाळा दुरुस्तीचे काम, मोहो येथे स्मशानभुमी बांधण्यात आली आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 17) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून वारदोली-बेलवली गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील बेलवली येथे 10 लाखांच्या निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण, 8 लाख रुपयांच्या निधीमधून वारदोली येथे मुख्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि 4 लाख रुपयांच्या निधीमधून बारदोली येथे शाळा दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतील पाली खुर्द येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण 8 लाखांचा निधी वापरून करण्यात येणार आहे, तसेच मोहो येथे 11 लाख 88 हजार 921 रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीमधून स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी, आयुष्यातील शेवटचा टप्पा हा स्मशानभुमीच असते. त्यामुळे ती अत्याधुनिक असावी असे प्रतिपादन केले.
या सर्व कार्यक्रमांसाठी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवामोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, नेरे जिल्हा परिषद अध्यक्ष सुनिल पाटील, युवामोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, वारदोली-बेलवली सरपंच संगीता भुतांबरा, उपसरपंच जितेंद्र बताले, भाजपचे गाव अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील, हेमंत तांडेल, अनंता पवार, राम भवर, नारायण भोपी, नारायण म्हात्रे, बबन पवार, अरुण पवार, नथुराम पवार, वांगणीतर्फे वाजे सरपंच सुरेखा पवार,
उपसरपंच अक्षता म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, माजी सरपंच गुरुनाथ भोईर, माजी उपसरपंच प्रविण पालव, नेरे जिल्हा परिषद अध्यक्ष सुनिल पाटील, पुंडलीक पाटील, राम म्हात्रे, लक्ष्मण म्हस्कर, भास्कर पाटील, विजय पाटील, मिथुन पाटील, माजी उपसरपंच संतोष शेळके, प्रविण पालव, अशोक पवार, भाऊ पाटील, दत्तात्रेय शेळके, एकनाथ पाटील, राम शेळके, पोलीस पाटील सुजाता पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.