कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळाले असून, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. नड्डा हे पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी दक्षिण परगणाच्या दिशेने चालले चालले असताना डायमंड हार्बर परिसरात त्यांच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
या प्रकरणानंतर जे. पी. नड्डा यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. आमच्या ताफ्यातील एकही वाहन असे नाही की ज्यावर हल्ला झाला नाही. बुलेटप्रुफ कार होती म्हणून वाचलो. पश्चिम बंगालमध्ये असहिष्णुतेचे वातावरण आहे याचेच हे उदाहरण आहे. या हल्ल्यात मुकुल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय यांना दुखापत झाली असून, ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांवर हल्ला झाला तो डायमंड हार्बर परिसर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात येतो. याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बुधवारी जे. पी. नड्डा उपस्थित असणार्या भाजपच्या कार्यक्रमात योग्य सुरक्षा नसल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …