Breaking News

कोप्रोली यात्रोत्सव उत्साहात साजरा

उरण : बातमीदार  : उरण तालुक्यातील कोप्रोली येथे कोप्रोली यात्रोत्सव 2019 नुकताच मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे या वर्षी श्री बापुजीदेव आणि श्री जोगेश्वरी देवीची यात्रा दि. 4 व 5 मे रोजी कोप्रोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दहा गावांची पारंपरिक यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी अशी या देवीची महती आहे. यात्रेत पाळणे, मिठाईची दुकाने, हार, फुले, नारळ, खेळणी, महिला वर्गासाठी सौंदर्य अलंकार, विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू विकावयास आल्या होत्या. भक्तगण श्री जोगेश्वरी देवीचे दर्शन घेताना दिसत होते. यात्रा पाहण्यासाठी उरण, चिरनेर, पनवेल, कल्याण, ठाणे, अलिबाग येथून भक्तगण आले होते. या उत्सवात कोप्रोली येथील मान्यवर, ग्रामस्थ, पाहुणे, उरण तालुका भाजप उपाध्यक्ष शशी पाटील, कल्पेश म्हात्रे, सुनील पाटील, विकी म्हात्रे, नंदन म्हात्रे, दत्तराज म्हात्रे, हृदयनाथ पाटील, योगेश गावंड, प्रीतम म्हात्रे, संदीप गाताडी, अमृत म्हात्रे, पर्जन्य म्हात्रे, महेश कोळी, विक्रांत पाटील, अश्विन दीनानाथ म्हात्रे आदी सहभागी झाले होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply