Breaking News

मालिका बरोबरीत, तरीही ‘अॅयशेस’ ऑस्ट्रेलियाकडे

लंडन : वृत्तसंस्था

अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अ‍ॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली आहे. मागच्या वर्षीची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. म्हणूनच अ‍ॅशेस चषक त्यांच्याकडे कायम राहिला.

स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक मार्‍यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला गेला. इंग्लंडने दिलेल्या 399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांत संपुष्टात आला.

चहापानाला ऑस्ट्रेलियाची दुसर्‍या डावात 5 बाद 167 धावा अशी अवस्था झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने शतकी खेळी करीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसर्‍या बाजूने योग्य साथ न मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. ब्रॉड आणि जॅक लेच यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले.

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्मिथने सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

1972नंतर म्हणजे 47 वर्षांत प्रथमच अ‍ॅशेस मालिका 2-2अशी बरोबरीत सुटली आहे. 2000नंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी प्रत्येकी पाच वेळा ही मालिका जिंकलेली आहे. मागची 2017-18ची मालिका ‘कांगारूं’नी जिंकली होती. त्यामुळे यंदाची मालिका बरोबरीत सुटूनही गतविजेतेपद म्हणून चषक ऑस्ट्रेलियाकडेच राहणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply