Breaking News

भाजपच्या विजय भोईर यांचे कौतुक

तब्बल 55 वेळा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी

उरण : बातमीदार, प्रतिनिधी

भाजपचे नवघर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी राजे शिवाजी मित्र मंडळ कोटनाका येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 55 वे रक्तदान केले. या अगोदर 54 ठिकाणी त्यांनी रक्तदान केले आहे. या त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आमदार महेश बालदींसह विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.

उरण तालुक्यात कोणाला रक्ताची गरज असल्यास ते तातडीने पुरवितात. रक्तामुळे कोणाचा जीव जाऊ नये. मृत्यूच्या दारात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रक्त मिळालेच पाहिजे अशी भावना विजय भोईर यांची आहे. त्यामुळे विजय भोईर हे याच सामाजिक भावनेतून रक्तदान करीत असतात. विजय भोईर हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेतच शिवाय विजय विकास सामाजिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्ष भर विविध सामाजिक उपक्रमही ते राबवित असतात. प्रत्येक कार्यात विजय भोईर व त्याचे भाऊ विकास भोईर हे नेहमी अग्रेसर असतात.

विजय भोईर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, लायन्स क्लबचे उरणचे अध्यक्ष सदानंद गायकवाड व इतर मान्यवरांनी विजय भोईर यांच्या समाज कार्याचा, रक्तदानाचे कौतूक करत त्यांचा गौरव केला आहे.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply