पनवेल : वार्ताहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व बौद्ध पौर्णिमा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आल्याकारणाने बौद्धजन पंचायत समिती पनवेल यांच्या वतीने उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या वेळी बौद्धजन पंचायत समिती पनवेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मान केला.