Breaking News

बलात्कार करणारा तोतया पोलीस गजाआड

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

पोलीस असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार करणार्‍या तोतया पोलिसाला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.  गुरुपाल सिंग पहूजा असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव असून तो नेरुळमध्ये राहणार आहे. त्याच्यावर रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन, जीवे ठार मारण्याची धमकी देत पीडित महिला तसेच तिच्या बहिणीवर सहकार्‍यांना बलात्कार करायला सांगेन अशी धमकी देणे, खंडणी स्वरूपात पैसे घेणे असे गुन्हे दाखल आहेत.

गुरुपाल पहूजा हा सानपाडा सेक्टर 30, ब्लीस स्पा या ठिकाणी येऊन त्याच्याजवळील रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच पीडित महिला यांना त्यांच्या बहिणीवर सहकार्‍यांच्या माध्यमातून बलात्कार करायला सांगेल अशी धमकी देऊन, पोलीस असल्याचे सांगत त्याच स्पा मधील केबीनमध्ये नेऊन बलात्कार करायचा. त्याच वेळी अश्लील व्हिडिओ बनवुन पीडित महिला यांना वारंवार फोन करून ते व्हिडीओ पती व सोशल मीडियावर प्रसारित करेल, अशी धमकी देत पैशाची मागणी करत होता. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत पीडित महिलेने गुगलपेच्या माध्यमातून 10 हजार रुपये गुरुपाल याला पाठवले. त्यावर न थांबता अजूनच त्रास देण्यास गुरुपाल याने सुरू ठेवल्याने अखेर त्याच्याविरोधात पीडित महिलेने सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा सानपाडा या ठिकाणाहून गुरुपाल पहूजा याला अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पवार यांनी दिली.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply