Breaking News

खोपोलीत बेकरी वस्तू निर्मिती प्रशिक्षण

खोपोली : प्रतिनिधी

सान्यो स्पेशल स्टील (मस्को) कंपनीच्या सीएसआर विभागातर्फे खोपोलीतील आण्णाभाऊ साठे सभागृहात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व सबलीकरण करिता पंधरा दिवस कालावधीचा नि:शुल्क बेकरी वस्तू निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. त्याचा लाभ 32 महिलांनी घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारची नानकटाई, बिस्किट, मावा केक, साधा केक, विविध प्रकारचे आयसिंग केक सोबतच दहा प्रकारची आईस्क्रीम, चॉकलेट व चॉकलेट बुके असे विविध बेकरी वस्तू शिकवण्यात आल्या. प्रशिक्षणार्थी महिलांना पल्लवी पाटील यांनी प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचा समारोप समारंभ मंगळवारी (दि. 27) झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी श्री. शैलेंद्र जैन, वरिष्ठ उपाध्यक्ष अविनाश सोमवंशी, सहाय्यक व्यवस्थापक तृप्ती पवार, विकास गणवीर, वरिष्ठ पत्रकार जयवंत माडपे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या चॉकलेट बुके व विविध प्रकारच्या केकची प्रमुख पाहुण्यांनी पाहणी केली. श्री शैलेंद्र जैन यांनी प्रशिक्षणार्थ्यींना मार्गदर्शन केले. अविनाश सोमवंशी, जयवंत माडपे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply