Breaking News

पावसाळा तोंडावर आलेला असताना नवी मुंबईमध्ये रस्ते खोदाई सुरूच

वाहनचालकांसह नागरिकांना होणार मनस्ताप

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

पावसाळा तोंडावर आलेला असताना नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रस्ते खोदाई करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे येणार्‍या पावसाळ्यात वाहनचालकांसह नागरिकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

पावसाळ्यामध्ये शहरात पाणी साचू नये, तसेच अपघात होऊ नये, यासाठी 15 मेपूर्वी रस्ते खोदाई करण्याचे काम हे कंत्राटदाराला पूर्ण करावे लागते; तर 15 मेनंतर रस्ते खोदाई करण्यास परवानगी नाकारण्यात येते. पण शहरात बिनधास्तपणे रस्ते खोदाई करण्यात येत आहे. रस्ते खोदाई करण्यात आलेल्या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे या मलमपट्टीमुळे खड्डे पडण्याची शक्यता व्यक्त

केली जात आहे.

ऐरोली सेक्टर पाच येथील परिसरामध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम आणि दिघा येथील मुकुंद कंपनीच्या समोरील रस्त्यावर खोदाई करून ठेवण्यात आली आहे. ऐरोलीत नाट्यगृहाचे कामही पूर्ण करण्यात आले नसून त्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. बिनधास्तपणे खोदकाम करण्यात आल्याने नाहक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

रस्ते खोदण्याची परवानगी बंद करण्यात आली आहे; तर कोणी खोदकाम करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

-संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply