Breaking News

सिंधूच्या कोरियन प्रशिक्षकाला मोदींनी दिले आयोध्या भेटीचे आमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. त्यामध्ये कांस्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूचाही समावेश होता. या कार्यक्रमाला सिंधूसह तिचे दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक पार्क तेई-सँग यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी खेळाडू तसेच प्रशिक्षकांशीही संवाद साधला. या वेळी मोदींनी दक्षिण कोरिया आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक बंधनावर प्रकाश टाकला आणि पार्क यांना अयोध्येला भेट देण्यासाठी आमंत्रणही दिले.

2018मध्ये पहिल्यांदा किम जोंग सूक यांनी अयोध्याला भेट दिली होती, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

पंतप्रधान मोदी पार्क यांना म्हणाले की, अयोध्या आणि दक्षिण कोरियामध्ये एक विशेष नाते आहे. दक्षिण कोरियाची पहिली महिला विशेष पाहुणी म्हणून एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. तुम्हीही अयोध्येला भेट दिली पाहिजे आणि इतिहास काय आहे हेदेखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. अयोध्येची राजकुमारी सुरिरत्नामुळे अयोध्येत आणि दक्षिण कोरियात ऐतिहासिक संबंध आहेत. राजकुमारी सुरिरत्ना इसवी सन 48 मध्ये कोरियामध्ये गेली होती आणि तेथील कोरियन राजा सुरोशी लग्न केले होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply